HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर आमदार आबिटकर पुन्हा विधानसभेचे मैदान मारणार : संजय मंडलिक

10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर आमदार आबिटकर पुन्हा विधानसभेचे मैदान मारणार : संजय मंडलिक

राधानगरी (प्रतिनिधी) : गेल्या 10 वर्षामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा ते विधानसभेचे मैदान मारतील असा विश्वास माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी व्यक्त केला. ते आमदार प्रकाश आबिटकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यादरम्यान आयोजित सभेत बोलत होते.

 यावेळी बोलताना मंडलिक म्हणाले की, आमदार आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, दळणवळण सुविधा, विविध शासकीय योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवून नागरीकांची सेवा करण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनतेला ते आपले घरातीलच आमदार वाटतात. या सर्व विकास कामांच्या बळावर व जनता-जर्नादनाच्या आशिर्वादावर ते पुन्हा तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून जातील व पुन्हा त्याच जोश व उत्साहाने मतदार संघाच्या विकासासाठी आहोरात्र झटतील असा विश्वास व्यक्त केला.

 यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, जिल्ह्याचे नेते गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पाठींबा दिला असून यामुळे मला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. गत दोन वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे सहकार्याने राज्यातील शिवसेना भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात यश आले. गावा-गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परिणामी गावच्या गावे विकास प्रवाहात सामिल झाल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे ते म्हणाले.

 यावेळी जेष्ठनेते के.जी.नांदेकर, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, आरपीआयचे राज्यसचिव प्रा.शहाजी कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, बाळासाहेब नवणे, अरुणराव जाधव, संभाजीराव आरडे, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले कल्याणराव निकम, नंदकुमार सुर्यवंशी-सरकार, अशोकराव फराकटे, अशोक पाटील, बाबा नांदेकर, रविश पाटील-कौलवकर, अभिषेक डोंगळे, तानाजीराव चौगले, मदनदादा देसाई, विजय बलुगडे, विजय महाडीक, नामदेव चौगुले, संदीप वरंडेकर, प्रल्हाद पाटील, धैर्यशील भोसले-सरकार, सुभाष जाधव, व्ही.टी.जाधव, विलास रणदिवे, संग्राम पाटील, दिपक शेट्टी, ॲड.प्रशांत भावके यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

आजपर्यंतच्या गर्दीचा उच्चांक

राधानगरी मतदार संघाच्या इतिहासामध्ये फॉर्म भरण्यासाठी इतकी गर्दी कधीही पहाण्यास मिळाली नव्हती. आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या विकास कामांमुळेच त्यांच्या प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते राधानगरी शहराच्या रस्त्यावर उतरलेले पहावयास मिळाले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.