छावा क्रांतिवीर सेनेच्या मागणीला यश

छावा क्रांतिवीर सेनेच्या मागणीला यश

रायगड प्रतिनिधी :-

रायगड श्रीवर्धन तालुक्यातील बस आगारामध्ये आवश्यक गाड्यांची पूर्तता करण्यात यावी अशी जनतेची तक्रार छावा क्रांतिवीर सेनेकडे आल्यावर दिनांक ०१/११/२०२३ रोजी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अगर प्रमुख मेहबूब मनेर साहेब श्रीवर्धन रायगड, यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन केले. मनेर साहेब यांनी जनतेचा व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राचा विचार करून थोडा ही विलंब न करता बस सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. 

गेले दोन वर्षापासून बंद असलेली गाडी दिनांक ९/११/२०२३ रोजी श्रीवर्धन वरून दुपारी ०१:०० वाजता पहिली गाडी सोडण्यात आली. छावा क्रांतिवीर सेना मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर, रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन महादेव पवार , निलेश जामकर , स्वप्निल घरत श्रीवर्धन तालुका अध्यक्ष धीरज कर्देकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उपस्थित पदाधिकारी साहिल सतनाक, अमोल मयेकर, नितेश जाधव , अथर्व पावशे, लखन वाघाटे, राहुल शिंदे, देवेश पवार, प्रसाद आदवडे, मंथन आमले, अमृत बोरेकर, ऋषी पालेकर, सार्थक करंजकर, राहुल करंजकर, आकाश करंजकर, आधी इत्यादी प्रवासी व पदाधिकारी उपस्थित होते. ही गाडी श्रीवर्धन गोरेगाव आंबेत मडणगड पालगड दापोली हे स्टॉप घेत जाणार असून दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास दापोली वरून सकाळी ०७:०० वाजता सुटणार आहेत तरी गेले दोन वर्ष बंद असलेली गाडी छावा क्रांतिवीर सेनेच्या पुढाकाराने जनतेच्या मागणीला प्राधान्य देऊन बस कर्मचाऱ्यांनी बस चालू करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त प्रवासांनी लाभ घ्यावा....