चिखलीत मराठा समाजाकडून एक दिवसीय उपोषण..
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा क्रांती मोर्चा नियोजन समिती, प्र चिखली यांच्यावतीने आज दि. 1/11/2023 रोजी सकल मराठा समाजा वतीने एक दिवसीय लाक्षणीय उपोषण जाहीर करण्यात आले आहे.
या उपोषणाचा उद्देश मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांना पाठिंबा देणे आणि मराठी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रयाग चिखली येथे छ. शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत ऑफिस येथे करण्यात आले.
या उपोषणात लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील, शिवसेना तालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, उपसरपंच अमर आंबले, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, अविराज पाटील, सोसायटी चेअरमन बट्टूसिंग रजपूत, सामाजिक कार्यकर्ते अरुण मांगलेकर, किरण पाटील, प्रसाद पिसाळ, अमित पोवार, सुरज फिटर, रामदास यादव, अबीद मुल्लानी, ग्रामपंचायत सदस्य दिपक कुरणे, किरण वरुटे, संजय कुरणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा नियोजन समिती, प्र. चिखली यांनी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, अद्यापही सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.त्यामुळं या आरक्षणाचा मुद्दा पेटतच चाललाय.