म.ह.शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

म.ह.शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  बेमुदत आंदोलन

म.ह.शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे  बेमुदत आंदोलन

गगनबावडा प्रतिनिधी : महादेव कांबळे

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं आहे. या कामबंद आंदोलनात गगनबावडा तालुक्यातील म.ह.शिंदे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही आपला सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान, या बंदचा दिवसभरातील महाविद्यालयीन कामकाजावर तसेच चालू परीक्षा कामावर परिणाम दिसून आला. 

  

यावेळी मुख्य लिपिक एम.पी.शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या आंदोलनात वरिष्ठ लिपिक डी. एस.सातपुते,ग्रंथपाल परिचर  एस.पी.चव्हाण, प्रयोगशाळा साहाय्यक  व्ही.ए.पोवार, आर.आर.नलवडे, व्ही.के.पाटील,

जे. बी. सूर्यवंशी,वाय. एस. तेली,ए.बी.शिंदे,डी. इन.पोवार,ए. ए. पाटील,आर.आर.चव्हाण,जी.इन.सरदेसाई आदींसह अन्य शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.