HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जयश्री चंद्रकात जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.

रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आई श्रीमती प्रेमला पंडितराव जाधव, माजी नगरसेविका वहिदा सौदागर, वैभवी जरग, रिलस्टार डॉ. शिवानी खामकर, राजमती सावंत, राजकुवर सावंत, नेहा होमिओपॅथिक असोसिएशनच्या सदस्या डॉ. सुषमा जगताप, डॉ. मंजुश्री मोरे, डॉ. दिपाली मॅडम, राष्ट्रीय काँग्रेस युवती विभागाच्या शहराध्यक्ष अंजली जाधव, निर्मला सालढाणा, विद्या घोरपडे, रजत ओसवाल, सोहन टिंडवानी, स्वप्नाली जगोजे, साहिल भारती आदी उपस्थित होते.

रास दांडियामध्ये युवती, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने  सहभागी झाले. नॉनस्टॉप म्युझिक, डीजे आणि दांडियाच्या तालावर सर्वांनीच नृत्याचा आनंद लुटला. पारंपारिक वेशभूषेत महिला व युवतींनी ग्रुप दांडिया नृत्याचे सादरीकरण केले.

रास दांडिया मध्ये विविध स्पॉट गेमने धमाल उडवली. तसेच नृत्याचा आनंद घेताना फाउंडेशनच्या वतीने विविध गटात बक्षीस देण्यात आली.

विविध गटातील विजेते पुढीलप्रमाणे : दांडिया ग्रुप : डेलिया ग्रुप (रंकाळा स्टॅन्ड), सनेडो ग्रुप (भक्तीपूजानगर), शरण्या ग्रुप (सम्राटनगर), उत्तेजणार्थ - गर्ल्स फॉरेव्हर (मंगळवार पेठ), विश्वशांती गरबा क्वीन ग्रुप (सम्राट नगर), करवीर निवासिनी ग्रुप (लाईन बझार, कसबा बावडा). गरबा क्वीन : जैना ओसवाल. बेस्ट ड्रेपरी : संपदा चव्हाण. राधाकृष्ण वेशभूषा : प्रीती पेडणेकर -नलिनी मेंगे, सपना शिंदे - अनिश शिंदे. दांडिया सजावट : स्मिता गुंदेशा. बेस्ट सेल्फी : श्रावणी सूर्यवंशी, अमरजा जाधव, रितल मालवणकर. लाईव्ह रील : सान्वी बाबर, श्रावणी बाबर, निशिगंधा पंडत, भाग्यश्री पाटील.  उत्साही जेष्ठ नागरिक महिला : प्रीती पवार.

या रास दांड्या कार्यक्रमात उपस्थित महिलांच्यामध्ये लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंत महिलेस दोन रात्री व तीन दिवसाची गोवा ट्रिप देण्यात आली. गोवा ट्रिपच्या विजेत्या सुप्रिया कारेकर ठरल्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.