ज्वेलरी संस्थेच्या वतीने जिल्ह्यात मतदान टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाला दिला मदतीचा हात
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मतदारांसाठी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोशिएशन, कोल्हापूर, महाराष्ट्र तसेच ऑल इंडिया ज्वेलर्स अंड गोल्डस्मिथ फेडरेशन या ज्वेलरी संस्थांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान 100% होण्यासाठी प्रशासना बरोबर खारीचा वाट उचलत सोने दागिन्यांवर मजुरीत 20% सूट देण्याची योजना जाहीर केली आहे.
20 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधी मध्ये हि योजना कार्यान्वित असणार असून, बोटावरील मतदान केलेली शाई दाखवून या डीस्काऊट योजनेचा लाभ घ्या असे आवाहन अध्यक्ष नचिकेत मुर्के व सर्व पदाधीकारींच्या वतीने कोल्हापूर जिल्यातील नागरिकांना करण्यात आले आहे.
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यावा व आपले कर्तव्य पार पाडून कोल्हापूर जिल्यात 100% मतदान होणेसाठी जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात , सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोशिएशन, कोल्हापूर, महाराष्ट्र तसेच ऑल इंडिया ज्वेलर्स अंड गोल्डस्मिथ फेडरेशन या ज्वेलरी संस्थेने केली आहे.