अर्धवट निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाची पीछेहाट......

अर्धवट निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाची पीछेहाट......

सेलू (गणेश साडेगावकर)

महाराष्ट्र राज्यात सत्तांतर नाट्य पूर्ण झाल्यानंतर अनेक महिन्यांच्या विसावा घेऊन, येथील सहकार क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर करण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाच्या धोरणानुसार राज्यातील शेतकऱ्यांना निवडणूक रिंगणात उभे राहण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाने दिला आहे . मात्र राज्यातील शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही . भारतीय जनता पक्षाच्या या अर्धवट निर्णयामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडींना भरघोस यश प्राप्त करता आले. त्या उलट भारतीय जनता पार्टी पक्ष व शिवसेना यांना पिछाडीवर राहावे लागले .असेच म्हणावे लागेल. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सत्ताधारी व विरोधक या दोघांचीही दिसत नव्हती . त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील व स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका मागील अनेक महिन्यापासून प्रलंबितच राहिल्या .यात कृषी उत्पन्न बाजार समिती ,खरेदी विक्री संघ तसेच नगरपालिका,महानगरपालिका पंचायत समिती ,जिल्हा परिषद या निवडणुकीचा कालावधी पूर्ण झालेला असताना देखील, राजकीय दृष्ट्या प्रतिकुल वातावरण असल्याकारणाने सत्ताधारी व विरोधक यांना निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक वाटले नाही .त्यामुळे या सर्व निवडणुका मागील अनेक महिन्यापासून प्रतिक्षेतच होत्या. दरम्यान राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी निवडणूक मतदार यादीत ,सदरील उमेदवाराचे नाव नसेल तरी ,शेतकरी असणाऱ्या प्रत्येकांना या निवडणुकीत उमेदवार म्हणून सहभाग नोंदवता येईल असा नियमात बदल केला .मात्र त्याच बरोबर सर्व शेतकरी बांधवांना मतदानाचा बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्याचा भारतीय जनता पक्षाचा निर्णय यावेळी सदरील निवडणुकीत अमलात आणल्या गेला नाही आणि त्यामुळेच, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभवाला तोंड द्यावे लागले .कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील एकूण 147 बाजार समिती पैकी 135 बाजार समितीचा निवडणूक निकाल जाहीर झालेला असताना ,महाविकास आघाडीला 71 जागेवर आपले यश मिळवता आले .तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला केवळ 44 जागेवर यश संपादन करता आले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने उमेदवारी साठी घेतलेला निर्णय मतदानासाठी न घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील निकालानंतर पराभवाला सामोरे जावे लागले .आणि पिछाडीवर राहावे लागले .

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एकूण 18 जागेपैकी भारतीय जनता पक्षाला केवळ सहा जागेवरच समाधान मानावे लागले .तर दहा जागेवर महाविकास आघाडीने विजय संपादन केला आहे . उर्वरित दोन जागेवर अपक्ष उमेदवारांनी विजय संपादन केला आहे .यातील एकूण 18 उमेदवारांपैकी सात उमेदवार हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीबाहेरील मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नवीन बाजार समिती निवडणूक धोरणातील शेतकरी उमेदवार असल्याकारणाने त्यांना प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात निवडणूक लढवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतदार यादीतील मतदार नसताना ,स्वतःला मतदानाचा अधिकार नसताना असे शेतकरी उमेदवार सात जागेवर विजयी घोषित करण्यात आले. हा भारतीय जनता पक्षाच्या अर्धवट निर्णयाच्या अंमलबजावणीचा परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उमेदवार होता येईल याची अंमलबजावणी करताना भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांना मतदारांचा अधिकार देखील बहाल केला असता तर ,राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे चित्र यापेक्षा वेगळे दिसले असते .त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रणालीत बदल करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे असेच म्हणावे लागेल.

तसेच ऐतिहासिक निर्णय म्हणजे मतदार यादीत नाव नसणाऱ्या उमेदवारांना देखील निवडणूक रिंगणात उभे ठाकण्याचा अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देऊन भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यासाठी मोठा अडचणीचा ठरणारा निर्णय घेतला आहे ..याचे परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होताना दिसत आहेत .असेच म्हणावे लागेल.