'हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप

'हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप
'हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप
'हिरा फेरी’तून अभिनयच्या अभिनयाची वेगळी छाप

कोल्हापूर / प्रतिनिधी

झक्कास मनोरंजनाला वेगवान तडका देत 'हिरा फेरी' करण्यासाठी अभिनेता अभिनय सावंत 'अल्ट्रा झक्कास' या मराठी ओटीटीवर लवकरच येत आहे. अभिनय हा महाराष्ट्राच्या लाडक्या लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा आहे. 

अभिनयने केदार शिंदे दिग्दर्शित 'श्रीमंत दामोदर पंत' या चित्रपटातून आपलं दमदार पदार्पण करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर 'अकल्पित', 'थापाड्या' या चित्रपटांसोबतच ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं!’, 'नवरी मिळे नवऱ्याला' या लोकप्रिय मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनामनात आणि घराघरात पोहचला आहे. अमोल बिडकर दिग्दर्शित आणि 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेंनमेंट प्रा. लि.'चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'हिरा फेरी' या आगामी चित्रपटात अभिनयची केमिस्ट्री 'बॉईज-२' फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे हिच्यासोबत जमली असून त्यासोबतच अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडीस्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांसोबत अभिनयची जुगलबंदी रंगणार आहे.