बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा... !

बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा... !
बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा... !

खलील शिरगांवकर / लालबाग, परेल प्रतिनिधी 

बालकलाकार आर्य तेटांबे याने आज आपला १५ वा वाढदिवस गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून साजरा केला. 

आर्यने लहानपणापासून आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत सामाजिक क्षेत्रात भरारी घेतली. आर्यनने आतापर्यंत बऱ्याच लघुपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

सध्या आर्य परेल येथील मनपाच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून आर्यला लहानपणापासूनच अभिनयाची आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे कोरोना काळात देखील आर्यने आपला वाढदिवस मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, फेस शिल्ड वाटप करून साजरा केला होता आणि याही वर्षी आर्य  याने आपला १५ वा वाढदिवस थाटात साजरा न करता गरीब गोरगरिबांना खाद्यपदार्थ वाटून आणि उबदार शाल प्रदान करून साध्या पद्धतीने साजरा करून आपले कर्तव्य सिद्ध केले आहे.