भोगावतीची रणधुमाळी पुन्हा सुरु होणार : 19 नोव्हेंबर ला मतदान

भोगावतीची रणधुमाळी  पुन्हा सुरु होणार : 19 नोव्हेंबर ला मतदान

राधानगरी प्रतिनिधी : निवास हुजरे 

भोगावती सहकारी साखर कारखान्याचा पावसाळ्याच्या कारणाने अर्ज भरून थांबलेला निवडणूक कार्यक्रम 25 ऑक्टोबर पासून सुरु होणार असून ऐन दिवाळीत रणधुमाळी पाहवयास मिळणार आहे.

   राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या आधी 20 जूनला सुरु झालेला निवडणूक कार्यक्रम 27 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरून झाले होते. 29 जूनला छाननी होण्याच्या आदल्या दिवशी पावसाळ्याच्या कारणाने शासनाने सर्वच निवडणुका लांबनीवर टाकल्या होत्या. त्यामुळे भोगावतीच्याही निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळाली होती. निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती तिथून पुन्हा सुरु होणार असून 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दाखल अर्जाची छानणी होईल. 26 ऑक्टोबर रोजी वैध नामनिर्देशनपत्राची यादी प्रसिद्ध होऊन 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील.10 नोव्हेंबर चिन्हाचे वाटप होईल. तर 19 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.भोगावतीची रणधुमाळी आता अधिकृतपणे सुरु होणार असून ऐन दिवाळीत वातावरण तापून कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडीना वेग येणार असून आघाड्यांच्या बांधणीचे चित्र थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.