कोल्हापुरातील "हा" रस्ता 60 दिवस राहणार बंद ..!
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील रस्ते डांबरीकरणासाठी सरकारने 100 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. याच निधी मधून शहरातील अनेक रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. दरम्यान कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी या मार्गावरील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचं काम करण्यात येणार असल्यानं हा रस्ता वाहतूकीसाठी ६० दिवस बंद राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महापालिकेच्यावतीनं करण्यात आलय. हे काम १० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.