HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये निवड

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) अंतिम वर्षात शिकणाऱ्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये नोकरीसाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली. 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी. एस. सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळवून दिली जाते. याचा उत्तम फायदा या विद्यार्थ्याना प्लेसमेंटसाठी झाला आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेळगाव येथील पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची निवड केली असल्याची माहिती प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी दिली. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सुरज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

सयाजी हॉटेल, सिनुना रेस्टॉरंट, वेस्ट इन, डबल ट्री बाय हिल्टन, हिल्टन गार्डन इन, मॅरिओट एक्सिक्यूटिव्ह, आय टी सी वेलकम हॉटेल, सेंट रेगीस  अशा नामवंत हॉटेल्समध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम हा उत्तम करीअर घडवणारा अभ्यासक्रम आहे.  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये डिप्लोमा, डिग्री या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून  विद्यार्थ्यानी आपला प्रवेश लवकर निश्चित करावा असे आवाहन  प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी केले. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.