HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांनी रिअ‍ॅलिटी शोजबाबतीत केलं 'हे' परखड वक्तव्य

प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांनी रिअ‍ॅलिटी शोजबाबतीत केलं 'हे' परखड वक्तव्य

मुंबई - झी मराठीवरील 'सारेगमपा' हा संगीतविश्वातील एक ऐतिहासिक टप्पा ठरलेला शो आहे. या मंचाने अनेक प्रतिभावंत गायक घडवले, जे फक्त मराठी नव्हे, तर बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. या गायकांसोबतच शोमध्ये सहभागी झालेल्या वादकांचाही तितकाच मोठा वाटा होता. विशेषतः शोमधील बासरीवादक अमर ओक हे नाव प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेलं आहे. सध्या सोशल मीडियावर "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज" हे कवितात्मक सादरीकरण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये अमर ओक आपल्या बासरीच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहेत. अशातच अमर ओक यांनी एका पॉडकास्टमध्ये रिअॅलिटी शोजच्या सध्याच्या परिस्थितीवर परखड वक्तव्य केल. 

अमर ओक म्हणाले, "आताचे रिअ‍ॅलिटी शो मला फारसे भावत नाहीत. कारण तिथे गाण्यापेक्षा ड्रामा जास्त असतो. शूटिंगदरम्यान सांगितलं जातं की, स्पर्धकाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे... म्हणजे मुद्दाम अश्रू काढायला लावतात. गाण्याला केवळ 10 टक्के महत्त्व आणि उरलेलं 90 टक्के भावनिक कथा हे समीकरण मला रुचत नाही."

अमर ओक पुढे म्हणाले, "आपण ज्या सारेगमपा शोचा भाग होतो, त्यामध्ये 90% लक्ष गाण्यावरच दिलं जायचं. स्पर्धकाची पार्श्वभूमी सांगणं ठीक आहे, पण गाणं हे केंद्रस्थानी असावं. आता मात्र आधी रडवायचं, मग गाणं ऐकवायचं, असं होत चाललंय. हे रिअ‍ॅलिटी शोज कमी आणि मालिकांसारखे जास्त वाटू लागले आहेत."

अमर ओक यांनी 'लिटिल चॅम्प्स' च्या पर्वाचाही उल्लेख करत त्या अनुभवांची आठवण करून दिली. "त्या सीझनमध्ये मुलं अतिशय मोकळेपणाने गायली. त्यांना कोणतंही प्रेशर नव्हतं. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत हे परीक्षक होते, त्यांनीही केवळ गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शो 6 महिन्यांऐवजी 9 महिने चालला. त्यानंतर त्या मुलांचे अल्बमही आले, त्यांना मानधन मिळू लागलं. आज मात्र परिस्थिती अशी आहे की, एखादा मुलगा दुसऱ्याच एपिसोडनंतर विचारतो की, ‘कमलेश दादा, माझा अल्बम कधी येणार?’"

या मुलाखतीमधून अमर ओक यांनी रिअ‍ॅलिटी शोजमधील खरेपणा हरवतोय, यावर मार्मिक भाष्य केलं. गाण्याच्या गुणवत्तेपेक्षा भावनिक कथा आणि ड्रामाला दिलं जाणारं अधिक महत्त्व  ही कलाही त्यांनी स्पष्टपणे मांडली.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.