पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज

पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज
जिल्ह्यात सहा अग्निशमन केंद्रांबरोबर तीन ठिकाणी रेस्क्यू पथके तैनात

https://youtu.be/sUf4plKNtHo

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे आता कोल्हापूर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

याच पार्श्वभुमीवर महापालिकेने शहरातील पूरबाधित भागांवर लक्ष केंद्रित केले असून मदतीसाठी सहा अग्निशमन केंद्रांबरोबर तीन ठिकाणी रेस्क्यू पथके तैनात केली आहेत. प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या ७२ जवानांबरोबरच स्थानिक संस्थांचे १५ जवान सज्ज आहेत. त्यांच्या मदतीसाठी तीन रेस्क्यू व्हॅन, १२ बोटी, रूग्णवाहिका, ट्रॅक्टर ट्रॉली, पाणी उपशाचे पंपही ठेवण्यात आले आहेत. सासने मैदान, महापालिका मुख्य इमारत, टिंबर मार्केट येथे तीन रेस्क्यू पथके सज्ज केली असून त्यामध्ये अधिकाऱ्यांसह आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.