HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

हिंगोलीतील 'या' अनोख्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हिंगोलीतील 'या' अनोख्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल

हिंगोली - लग्नसोहळा पार पडत असताना हौसेला काही मोलच नाही हे खरे ठरवणारा एक अनोखा लग्नसोहळा हिंगोली जिल्ह्यात पहायला मिळाला. सेनगाव तालुक्यातील खुडज गावात पार पडलेल्या या लग्नात वर - वधूने पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा मार्ग अवलंबत थेट ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात एन्ट्री केली.

शेतकरी समाधान एकनाथ टाले यांच्या मोठ्या मुलीचा विवाह विदर्भातील येवती गावचे विठ्ठल गुलाबराव शिंदे यांच्याशी निश्चित झाला होता. टाले कुटुंबियांची  शेतकरी पार्श्वभूमी असूनही त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात कुठलीही तडजोड न करता, लग्नसोहळा थाटामाटात पार पाडला. 

पारंपरिक घोडा किंवा चारचाकीऐवजी, वर विठ्ठल आणि वधू ज्ञानेश्वरी यांनी ट्रॅक्टरवरून लग्नस्थळी येण्याचा निर्णय घेतला. शेतकरी जीवनाशी नातं सांगणाऱ्या ट्रॅक्टरवरून नवदांपत्याने स्टेजवर एन्ट्री केली, ज्यामुळे पाहुणे अवाक झाले. या हटके अंदाजात झालेल्या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय. 

https://x.com/harish_malusare/status/1928346049975845243

समाधान टाले यांच्या चार मुलींपैकी ही मोठी कन्या असून, तिचं लग्न खास आणि संस्मरणीय व्हावं यासाठी टाले कुटुंबाने आयुष्यभराची पुंजी पणाला लावली. मेहनतीच्या उपजिविकेवर उभं राहिलेलं हे शेतकरी कुटुंब आज आपल्या कष्टाचं फळ आनंदाने साजर करत असल्याचं दिसत होतं. हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.