HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच जमा होणार ; मात्र 'या' गोष्टी कराव्या लागणार

किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच जमा होणार ; मात्र 'या' गोष्टी कराव्या लागणार

PM Kisan 20 th Installment - पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. हप्ता जून महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे. तरीही सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, काही अहवालांनुसार २० जूनच्या सुमारास हा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो.

पीएम किसान योजना काय आहे?

ही योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) दिली जाते.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

- लाभाच्या माहितीसाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला नियमित भेट द्या.

- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणारे SMS तपासत राहा, कारण त्यातूनही हप्त्याबाबत माहिती मिळू शकते.

ई-केवायसी अनिवार्य :

जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे पुढीलप्रमाणे e-KYC प्रक्रिया पूर्ण करा :

- pmkisan.gov.in ला भेट द्या

- ‘e-KYC’ वर क्लिक करा

- आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाका

- OTPद्वारे पडताळणी करा आणि सबमिट करा

- तसेच, जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक केवायसीही करता येते.

लाभार्थी यादीत आपले नाव आहे का ते तपासा :

- pmkisan.gov.in वर Beneficiary List वर क्लिक करा

- आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडा

- ‘Get Report’ वर क्लिक करा

- स्क्रीनवर दिसणाऱ्या यादीत आपले नाव तपासा

मागील हप्त्याची माहिती :

२४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूर येथून १९ वा हप्ता जाहीर केला होता. तेव्हा देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २२,००० कोटी रुपये थेट खात्यात जमा करण्यात आले. यामध्ये २.४१ कोटी महिला शेतकरी सहभागी होत्या.

हप्ता वितरणाचे वेळापत्रक :

दरवर्षी फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये हप्ता वितरित केला जातो. त्यामुळे आता शेतकरी जून महिन्यात येणाऱ्या २० व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.