शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्याला दिले भलतेच ज्ञान, प्रेग्नंट राहिली...13 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन 23 वर्षाची शिक्षिका पसार झाली

शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्याला दिले भलतेच ज्ञान, प्रेग्नंट राहिली...13 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन 23 वर्षाची शिक्षिका पसार झाली

सुरत : एका शिक्षिकेने तिच्या घरी शिकवणीसाठी येणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. परंतु तत्परतेने पोलिसांनी शिक्षिका आणि विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला शिक्षिका उडवा उडवीची उत्तरे देत होती. परंतु, पोलिसांनी कठोर भूमिका घेताच ती भडाभडा बोलू लागली. आणि एक धक्कादायक बाब समोर आली.

गुजरातमधील सुरतमध्ये १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या गर्भवती महिला शिक्षिकेचा गर्भपात करण्यात आला आहे. विशेष POCSO न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायालयाने असेही म्हटले की, गर्भ डीएनए चाचणीसाठी सुरक्षित ठेवावा. महिला शिक्षिका २२ आठवड्यांची गर्भवती होती.

 न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, महिलेचा गर्भपात सुरत महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्माइमर रुग्णालयात करण्यात यावा. आरोपी ट्यूशन शिक्षिकेने २५ एप्रिल रोजी तिच्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. चौकशीदरम्यान, शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की ती विद्यार्थ्याच्या मुलाची आई होणार आहे. तिच्या पोटात ५ महिन्यांचा गर्भ आहे. यामुळे ती विद्यार्थ्यासोबत पळून गेली.

विद्यार्थ्यानेही महिला शिक्षिकेसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याची कबुलीही दिली. यासोबतच, विद्यार्थ्याच्या वैद्यकीय अहवालात तो वडील होण्यास सक्षम असल्याचे दिसून आले. पोलिस न जन्मलेल्या बाळाची आणि विद्यार्थ्याची डीएनए चाचणी करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या पूना भागात राहणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचे त्याच्या २३ वर्षीय शिकवणी शिक्षिकेने अपहरण केले आणि ती २५ एप्रिल रोजी पळून गेली. दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती. अखेर, ३० एप्रिल रोजी पोलिसांनी दोघांनाही राजस्थान सीमेजवळील बसमधून पकडले. दोघेही जयपूरहून अहमदाबादला येणाऱ्या एका खाजगी बसने प्रवास करत होते.

गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध

पोलिस चौकशीदरम्यान दोघांनीही सांगितले की, ते गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. शिक्षिकेने कबूल केले की तिचे विद्यार्थ्यासोबत सुमारे एक वर्षापासून शारीरिक संबंध होते. अलिकडेच तिला कळले की ती गर्भवती आहे. यामुळे ती विद्यार्थ्यासोबत पळून गेली. विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या शहरात लपून राहण्याची शिक्षिकेची योजना होती.