कै. वसंत पांडुरंग लोहार यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कै. वसंत पांडुरंग लोहार यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कै. वसंत पांडुरंग लोहार यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

नारायण लोहार / सिंधुदुर्ग प्रतिनिधी

कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यातील भेडसागाव येथील आनंद माध्यमिक विद्यालय येथे 2 सप्टेंबर रोजी कै. वसंत पांडुरंग लोहार यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. 

कै. वसंत पांडुरंग लोहार यांचे चिरंजीव रमेश वसंत लोहार आणि नातू सिद्धेश रविंद्र लोहार यांच्या हस्ते आनंद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमातून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला. आनंद माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. आनंदराव पाटील आणि कै. वसंत लोहार हे जिवलग मित्र होते. त्यांच्या मैत्रीची जाणीव ठेवून कै. वसंत लोहार यांच्या मुलांनी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम पार पाडला. 

विद्यालयाच्या जडणघडणीत कै. वसंत लोहार यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ते या विद्यालयाच्या संस्थेचे संचालकही होते. कै. वसंत लोहार यांना सामाजिक कार्याची फार आवड होती. त्यांचा सेवाभावी वारसा त्यांच्या मुलांनी चालवला आहे. यावेळी शाळा समिती सदस्य जयराम पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक के. बी. ठोंबरे, एस. एम. सुतार, टी. ए. जाधव, ए. डी. पाटील, एस. जी. कांबळे आणि एस. एम. मुलाणी हे शिक्षक उपस्थित होते.