शिवजयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या निकिता माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिर पार

शिवजयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या निकिता माने यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिर पार

शिवजयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या निकिता माने यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिर पार 

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवजयंती निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या निकिता माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते.शिबिराची सुरुवात समाजातील जातीभेदाला छेद देत,रूढी-परंपरा जुडकावून विधवा प्रथा बंदीला मोडून काडत विधवा महिलांचा सत्कार आणि माणूस म्हणून प्रत्येक माणसात माणुसकी असतेच आणि माणुसकी साठी लिंगभेद न ठेवता महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी सदस्य राजमंडळ व मैत्री संघटनाचे तृतीयपंथी  पदाधिकारी यांच्यापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी डॉ. महेंद्र कानडे जनरल फिजिशियन आणि डॉ.वैशाली कानडे स्त्री रोग तज्ञ कानडे हॉस्पिटल शाहूपुरी,स्वराज पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकारी संघटना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय पक्ष,संभाजी ब्रिगेड,ताराराणी ब्रिगेड शिवसेना युवा सेना शहरप्रमुख, मा. सौ. ऋग्वेदा माने स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थापिका,अखिल भारतीय हिंदू संघटना,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, लगोरी फाउंडेशन आणि तसेच समाजातील विविध पदावरील पदाधिकारी उपस्थितीत होते.येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत  करण्यात आले.शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला.

निकिता माने ह्या स्वराज  पोलीस पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे  संघटक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक युवती समन्वयकअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महिला शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांने मोलाचे योगदान दिल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.