HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पाणंद रस्ता खुला करा अन्यथा आमरण उपोषण करणार; कळंत्रेवाडीकरांचा प्रशासनास निवेदनाद्वारे इशारा

पाणंद रस्ता खुला करा अन्यथा आमरण उपोषण करणार; कळंत्रेवाडीकरांचा प्रशासनास निवेदनाद्वारे इशारा

पाणंद रस्ता खुला करा अन्यथा आमरण उपोषण करणार; कळंत्रेवाडीकरांचा प्रशासनास निवेदनाद्वारे इशारा

उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी ता कराड हद्दीतील शासकीय शिवकालीन सुकाई देवी पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ता खुला करावा अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कळंत्रेवाडीकर ग्रामस्थांनी महसूल प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नाणेगाव(पुनर्वसन) ते  सुकाई देवी मंदिराहून पुढे जाणाऱ्या शासकीय पाणंद रस्त्यालगतच्या हिस्सेदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अवजड वाहतूक तसेच शेतमालाची ने-आण करण्यास खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. याबाबत शासकीय नियमानुसार रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी लेखी अथवा तोंडी कळवले आहे. परंतु प्रशासनाने आजपर्यंत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांना केराची टोपली दाखवली असून सपशेल डोळेझाक केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा संयम संपला असून येत्या पंधरा दिवसात सदरचा रस्ता खुला केला नाही तर सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. यावेळी माजी सरपंच गोपाळराव येळवे,उपसरपंच दिलीप यादव, माजी उपसरपंच सुनील थोरात,दत्तात्रय थोरात,शंकर थोरात,राजेंद्र थोरात,अनिल थोरात, पत्रकार रघुनाथ थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.