स्वराज्य संघटना आयोजित एकदिवसीय महाराजस्व अभियान मौजे कोळवन तालुका मुळशी येथे उत्साहात संपन्न

स्वराज्य संघटना आयोजित एकदिवसीय महाराजस्व अभियान मौजे कोळवन तालुका मुळशी येथे उत्साहात संपन्न

स्वराज्य संघटना पुणे यांच्या तर्फे कोळवण विभागातील रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे, दुबारशिधापत्रिका,आयुष्यमान भारत कार्ड,७/१२ दुरुस्ती, आधारकार्ड लिंक करणे व नवीन काढणे, शेतकरी सन्मान योजना फॉर्म भरणे असे ११२ नागरिकांचे कामे मार्गी लावण्याचे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून केले

ह्या अभियानाला नायब तहसिलदार मा श्री अरुण कदम साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली त्यांनी जनतेच्या अडचणी समजून घेतल्या व नागरिकांना संभोधित करताना नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात जास्तीत जास्त भर दिला जाईल हे सांगितले

स्वराज्य संघटना पुणे जिल्हा निमंत्रक राजू फाले यांनी नागरिकांच्या नागरी सुविधेबद्दलच्या अडचणींचा पाडा नायब तहसिलदार ह्यांच्या पुढे मांडला कोळवन विभागात मागणी पुढीलप्रमाणे

कोळवन येथे मंडल अधिकारी कार्यालय तात्काळ व्हावे

दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराजस्व अभियान राबवावे जेणेकरून नागरीकांच्या दैनंदिन अडचणीच्या मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्तता मिळेल 

आदिवासी समाज आजही नागरी सुविधेपासून वंचित आहे त्यांचा प्रश्न मार्गी लावणे

अनेक नागरिकानी व्यक्त होताना स्वराज्य संघटनेने घेतलेल्या अभियानामुळे आमच्या पौड येथे नागरी सुविधेसाठी वारंवार हेलपाटे मारणे व मानसिक व आर्थिक त्रासातून मुक्तता मिळाली

सदर कार्यक्रमाला कोळवन सरपंच मा सौ धनश्री पालकर, चिखलगाव सरपंच लहू फाले, साठेसाई उपसरपंच गणपत साठे, भैरवनाथ वि वि सोसायटीचे संचालक प्रकाश फाले, कोळवन च ग्रामपंचायत सदस्य मा गणेश कडू चिखलगाव चे माजी सरपंच मालपोटे ,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नामदेव अप्पा टेमघरे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पालकर,हाडशी गावचे सामाजिक कार्यकर्ते भगवान लोयरे, नानेगावचे ,माऊली लाखवडे,मराठा महासभा संघटना गिरीश चव्हाण, सुनील तोडकर

 स्वराज्य संघटना निमंत्रक प्रतीक साखरे, संजय ठाकरे,संतोष क्षीरसागर, विकास काळभोर, मंदार अमराळे,अक्षय बुचडे, मंगेश जांभुळकर,पांडुरंग शेळके,अनिकेत हुलावळे,राजेंद्र शेळके,प्रकाश साळवे,सुधीर फाले,अनिकेत भेगडे,गणेश येनपुरे, धनंजय जोरी आदी पदाधिकारी व कोळवन विभागातील नागरिक उपस्थित होते.