दिल्ली विजयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव

दिल्ली विजयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव

कोल्हापूर प्रतिनिधी : दिल्ली विधानसभेत मिळालेल्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थिती मध्ये शासकीय विश्रामगृह येथे भाजपा प्रमुख पदाधिका-यांच्या संघटनात्मक बैठकीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित सर्वांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुणराव इंगवले, राहुल चिकोडे, भाजयूमो प्रदेश सचिव अल्केश कांदळकर, सरचिटणीस शिवाजी बुवा, डॉक्टर आनंद गुरव, सौ सुशीला पाटील, डॉ .स्वाती पाटील गायत्री राऊत, अशोक देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.