कोरे अभियांत्रिकीच्या पुणे स्नेहमेळावा उत्साहात पार

कोरे अभियांत्रिकीच्या पुणे स्नेहमेळावा उत्साहात पार

वारणानगर (प्रतिनिधी) - तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) वारणानगर यांच्या पुणे पिंपरी - चिंचवड परिसरातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. “आठवणी, आपुलकी आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय सोहळा!” अशी या स्नेहमेळाव्याची संकल्पना होती. 

या विशेष कार्यक्रमात पद्मश्री डॉ. जी. डी. यादव (माजी कुलगुरू, ICT मुंबई) यांची खास उपस्थिती होती. त्यांनी नवकल्पनांचा शोध घेण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. त्यांची उपस्थिती हे सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणय व गौरवाची बाब होती. 

विज्ञान एक्स चे राष्ट्रीय उपक्रमाचे समन्वयक आणि 'संकल्प सेमीकंडक्टर' चे संस्थापक विवेक जी. पवार यांनी भारतातील सेमीकंडक्टर क्रांतीवर प्रभावी मार्गदर्शन केले. ग्रामीण तंत्रज्ञान विकास व कौशल्यवृद्धीसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

या मेळाव्याला श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, आमदार, डॉ. विनयरावजी कोरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळांचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रा. डॉ. विलास. व्ही. कारजिन्नी अधिष्ठाता, डॉ. एस.एम.पिसे, प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, माजी विद्यार्थी समिती समन्वयक, प्रा. बी. आर बागणे उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या शेवटी नितीन भट्टड आणि पल्लवी तावरे यांनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी व मान्यवरांना आभार भेटवस्तू (रिटर्न गिफ्ट) प्रदान केली, ज्यातून त्यांची आपुलकी व कौतुकाचे भाव स्पष्टपणे दिसून आली.

स्नेहमेळाव्याचे यश हे सत्यजीत भोसले, तानाजी पोळ, पल्लवी मुखर्जी, तुषार पाटील, विद्यानंद गावडे, सचिन गाडे, संतोष रक्तवान, विपुल पाटील, अजय तारीबागील आणि इतर आयोजकांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे.

या मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमातून केवळ आठवणींचा नवउजाळा नाही, तर नव्या व्यावसायिक संधी, नेटवर्किंग आणि प्रेरणादायी विचारांची देवाणघेवाण घडून आली – हेच या स्नेहमेळाव्याचे खरे यश!