पोलीस अधीक्षकांची सोने - चांदी कारागीर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

पोलीस अधीक्षकांची सोने - चांदी कारागीर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सध्या संपूर्ण भारतामध्ये बांगलादेशी तसेच रोहिंग्या मुस्लिमांच्या अनाधिकृतपणे राहण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा नुतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे कोल्हापूर या सुवर्णकारांच्या कलानगरी मध्ये स्वागत केले. या भेटीत बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरी ज्वेलरी क्षेत्रातही असण्याची शक्यता असण्याच्या संदर्भात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. तसेच ज्वेलरी व्यापारी, ज्वेलरी उत्पादक यांच्याकडून कामाला मिळालेले सोने घेऊन बंगाली कारागीर पसार होण्याच्या घटनांवर देखील चर्चा झाली. 

पोलीस अधीक्षक यांनी डीवायएसपी अधिकारी यांच्या अंतर्गत समिती नेमून यामार्फत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व व्यापारी व ज्वेलरी मॅन्युफॅक्चर यांच्याकडून बंगाली कारागीरांची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी असे सांगितले. त्याचप्रमाणे जे बंगाली भाडेकरू म्हणून राहात आहेत त्यांची नोंद मालकांनी पोलीस स्टेशनला द्या असे नमूद केले. या सर्व विषयांवर चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिले. 

यावेळी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष प्रकाश घाटगे, सेक्रेटरी गोपीनाथ नार्वेकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय म्हसवेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.