यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कै. यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने भारताचे दिवंगत उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त, उद्या (दि. १२) यशवंतराव चव्हाण यांच्या “दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन” मानव्यशास्त्र इमारतीमध्ये आयोजित केले आहे. 

त्याचप्रमाणे “यशवंतराव चव्हाण: संस्काराचे अमृतकुंभ” या विषयावर माजी प्राचार्य डॉ. गणपतराव कणसे (कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख असतील. सदर प्रदर्शन आणि व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक व नारिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी केले आहे.