Gold Rate :भारत - पाक युद्धाचा परिणाम सोन्यावरही, आजचा नेमका भाव किती ?

मुंबई : 7 मे रोजी युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल न केल्याने सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि गाझा यांच्यातील वाढत्या तणावामुळे सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित-आश्रय गुंतवणुकीकडे कल वाढला आहे.
आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याने 2001 पासून 15 टक्के सीएजीआर परतावा दिला असून, 1995 पासून महागाईच्या दरापेक्षा 2-4 टक्क्यांनी अधिक फायदा दिला आहे.
10 मे रोजी सकाळी 7:30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा दर 96,535 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला. या दरात 367 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचवेळी एमसीएक्सवरील चांदीचा दर 95,600 रुपये प्रति किलो होता.
इंडियन बुलियन असोसिएशनच्या (IBA) आकडेवारीनुसार, 10 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 24 कॅरेट सोन्याची किंमत 96,880 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 22 कॅरेट सोन्याचा दर 88,807 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला. त्याचप्रमाणे चांदी (999 फाइन) 96,870 रुपये प्रति किलो असल्याची माहिती IBA वेबसाइटवर देण्यात आली आहे.