इरा किड्स प्ले स्कूल व स्वरूप बालक मंदिर दौंड तर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

इरा किड्स प्ले स्कूल व स्वरूप बालक मंदिर दौंड तर्फे  प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था संचलित इरा किड्स स्कूल व स्वरूप बालक मंदिर भोईटे नगर दौंड या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान चिमुकल्यांचे भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, घेण्यात आले दौंड नगरपरिषद मार्फत पन्नास हून अधिक विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दौंड नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर मा. शहराध्यक्ष मा. तहसीलदार आयु. श्रीकांत शिंदे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आयु. जयदीप बगाडे विधीकार आयु. साहेबराव पोळं साहेब तसेच दौंड नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक मस्के साहेब दौंड नगर परिषदेचे शहर समन्वयक शुभम चौकटे साहेब इत्यादी प्रमुख मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच शाळे मार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक (प्ले ग्रुप) आतीक्षा अक्षय कांबळे ,(नर्सरी) प्रणय अमोल डेरे ,ज्(युनिअर केजी) रियांशी शशिकांत पवार ,(सिनियर केजी) शौर्य दादाराम होले तसेच विजेते झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली रणदिवे, शिक्षिका प्रतिभा शिंदे शिल्पा कांबळे शितल शिंदे आणि रूपाली लोंढे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयु. सदाशिव रणदिवे यांनी मानले.