भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

कौलव प्रतिनिधी : निवास हुजरे

परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीमध्ये नूतन संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.निवडणुक प्रक्रियेतील संस्था गटातील मतदार यादी निश्चित करण्याचा साठी येत्या सोमवारी पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.

      जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी ए.व्ही. गाडे यांनी या संदर्भात नोटीस प्रसिद्ध करून संस्था गटातील ठराव नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.या नोटिसीमध्ये नियम आणि अटी देखील घातल्या असून येत्या सोमवार दिनांक २७ मार्चपासून २६ एप्रिल पर्यंत ठराव जमा करण्यासाठी कळवण्यात आलेले आहे.तसेच एका संस्थेने एकच ठराव द्यावा, दुबार ठराव नोंद केल्यास संचालक मंडळावर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.ठराव दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अगर संबंधित संस्थेची निवडणूक झाल्यास दुसऱ्यांदा सुधारित ठराव देण्याची अट घातलेली आहे.

  ज्या संस्था ३१/१/२०२० पूर्वी कारखान्याकडे सभासद झालेल्या आहेत अशा संस्थाच मतदानासाठी पात्र ठरवल्या जाणार आहेत.असेही नोटीस मध्ये म्हटले आहे.

 भोगावती कारखान्याच्या संचालक मंडळाचे २४ एप्रिल;२०२२ ला मुदत संपलेली आहे.विविध कारणाने ही निवडणूक लांबणीवर पडलेली होती.ती आता होत आहे.