अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनकरिता वाहतूक व्यवस्था करावी : प्राचार्य डॉ.गर्गे
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
शासकीय तंत्रनिकेतन व नव्याने सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्थानिक व राज्यातून विद्यार्थ्यांनी उच्चतंत्रज्ञान अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला आहे. त्यांना सर्वतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तरी परिवहन विभागांनी विद्यार्थी-पालक, कर्मचारी यांच्याकरिता वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. असे, आवाहन शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय गर्गे यांनी संबंधितांना निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे कोल्हापूर विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे व सहाय्यक वाहतूक अधीक्षक शितल चिखलवाळे,सौ.सुचिता सुतार यांची भेट घेऊन जुना पुन्हा बेंगलोर हायवे, तंत्रनिकेतनच्या प्रवेशद्वारा नजीक कायमस्वरूपी बस थांबा व्हावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तसेच शहर परिसरातूनही अनेक विद्यार्थी संस्थेत येत असतात त्यांची वाहतूक व्यवस्था व्हावी याकरिता कोल्हापूर महानगरपालिका मुख्य लेखापाल व अतिरिक्त परिवहन प्रमुख संजय सरनाईक यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था व्हावी यासाठी तंत्रनिकेतन च्या वतीने प्राध्यापक अमोल पाटील व ज्येष्ठ निदेशक दत्ता सुतार यांनी भेट घेऊन व सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.यावेळी शितल चिखलवाळे व रवी धुपकर यांनी यावर तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांना जागेवर मासिक पास व इतर सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले.