लोकनेते कै.बाबुराव आण्णा पाटील प्रशाला वडापूर येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा....

लोकनेते कै.बाबुराव आण्णा पाटील प्रशाला वडापूर येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा....

सोलापूर / प्रतिनिधीलोकनेते कै.बाबुराव आण्णा पाटील प्रशाला, वडापूर येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मयोगी लक्ष्मण तात्या वाघचवरे शिक्षण संकुलाच्या प्रांगणात कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मिनीताई वाघचवरे या होत्या. तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार समीर शेख अंत्रोळीकर आणि पत्रकार महासिध्द साळवे हे लाभले होते.


या सर्व मान्यावरांचे स्वागत गीतांनी स्वागत करण्यात आले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी पंचप्राण शपथ देण्यात आली. कवायतीचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करण्यात आली. गुणसंन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन संस्थेचे सचिव दर्शन वाघचवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा डॅा.तृप्ती रणवरे,मंगेश वाघचवरे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यत आले.तसेच देशभक्तीपर गित गायनाला हार्मोनियमवर साथ ह.भ.प.वाघचवरे महाराज यांनी दिली.देशभक्तीपर नृत्य सादरी करणास अंबादास आडकी यांचे मार्गदर्शन लाभले.


संस्थेचे सचिव यांच्या प्रेरणेतून प्रशालेतील मुलीनी स्वयंस्फूर्तीने सॅडविच तयार करून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पवार ज्ञानेश्वर यांनी केले तर आभार संतोष भोसले यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रशालेतील शिक्षक औंदुबर बंडगर,शिक्षिका  विद्या गायकवाड, सेवक आनंद कदम तसेच प्रतीश ओहाळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.