कणेरीवाडी गावात कृषीकन्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कणेरीवाडी गावात राजर्षी छत्रपती शाहु महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण जागरुकता कार्यनुभवाअंतर्गत कृषीकन्या प्राची दाश, भाग्यश्री ढोकळे, निकिता बिरादार, ज्ञानेश्वरी चिंचकर, वैष्णवी बोराडे, ऋतुजा धालवडे, यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कणेरीवाडी गावचा नकाशा रांगोळीच्या स्वरुपात काढला. तसेच भाग्यश्री ढोकळे हिणे सर्व कृषी कन्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
शेतकऱ्यांना विविध पिकावरील रोग नियंत्रण कसे करावे, दूधापासून विविध पदार्थ कसे करावे, चारा प्रक्रिया, माती परिक्षण, मोबाईल ॲपता वापर कसा करावा याविषयी कृषीकन्यांकडुन विविध प्रात्यक्षिके दिली जात आहे.
यासाठी कोल्हापुर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॅा. एस. बी. खरबडे, रावे समन्वयक डॅा. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी श्रीमती सीमा सरवदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कणेरीवाडीच्या सरपंच शामल कदम, रविराज घोडके तसेच सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.