लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जातीधर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला : माजी पाणी पुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे

लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जातीधर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला : माजी पाणी पुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे

लातूर प्रतिनिधी:- अरविंद पत्की 

१६ कोटी पाणीपुरवठा योजनेचा आ.बनसोडे यांच्या हस्ते भुमीपुजन

उदगीर : शहरालगत असलेले मलकापूर हे गाव उदगीर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून या गावातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये म्हणून मी पाणीपुरवठा मंत्री असताना ही योजना मंजूर करुन या पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत तब्बल १६ कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन दिला असुन सदर योजनेचा कालावधी हा २१ महिन्याचा आहे मात्र तो त्या आधिच पूर्ण करुन येथील नागरिकांची सोय करावी व प्रत्येक कुंटुबांपर्यंत नळ कनेक्शन द्या जेणे करुन एकाही कुंटुंबाला पाणी टंचाई भासु नये हा माझा प्रमाणिक प्रयत्न आहे. आजपर्यंत मी लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जातीधर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत माजी पाणी पुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

 मलकापूर ता.उदगीर येथील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १६०७.९३ लक्ष रु. नळ पाणी पुरवठा योजनेचा उद्धाटन शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापुरचे सरपंच गुरुनाथ बिरादार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती प्रा.शिवाजी मुळे, दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे,

शिवसेनेचे कैलास पाटील, प्रा. श्याम डावळे,उपसरपंच महेबूब शेख, मनोहर कांबळे, नेत्रगावचे बालाजी पाटील, सय्यद जानी,श्रीकांत पाटील, मुकेश भालेराव, नामदेव पवार, एस.डी. लहाने, सदस्य सुनिल पाटील, गंगाधर पवार सचिन पवार सतीश पाटील आशाबी शेख, सय्यद इरफान, चंद्रकला म्हेत्रे, महानंदा भालेराव दिपाली महिंद्रकर बनशेळकीचे सरपंच विकास शेळके, बामणीचे सरपंच राजकुमार बिरादार, निलेश पाटील नर्सिंग चिमणचोडे, येणकीचे सरपंच अरविंद बिरादार, ग्रामसेवक संतोष पाटील, लिपिक शिवराज भ्रमण्णा, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.बनसोडे यांनी, मी पाणीपुरवठा मंत्री असताना पाणीपुरवठा योजनेसाठी ३४ हजार कोटी रुपयाची कामे मंजूर केले होते. आज आपण एमजेपीच्या माध्यमातून ५६० कोटीची कामे करत आहोत.

मतदार संघातील प्रत्येक गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी ६६० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. प्रत्येक कुंटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर प्रमाणे पाणी देणार आहे. आपल्या भागातील वार्डाचा विकास ग्राम पंचायत सदस्य तर गावचा विकास सरपंचानी केला पाहिजे. आपण सर्वांनी जागरुक राहून यापुढे काम करणा-या व्यक्तीच्या मागे आपण खंबीर उभे रहा असे आवाहन करत मलकापूर गावासाठी कोट्यावधीचा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. आपल्या मलकापूर गावातील एस.टी. काॅलनीजवळील नळेगाव रोडवरील

उड्डान पुलावरील पथदिवे आपण मंजूर करुन ते उभारले आहेत. या उड्डानपुलाच्या बाजुच्या 

सर्विस रस्ता व नाली करणार असुन मलकापूर भागात २ उड्डान पुल मंजुर केले आहेत. मलकापूर गावच्या विकासासाठी विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही. उदगीर येथील लिंगायत स्मशानभुमीसाठी आत्तापर्यंत ४५ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर लिंगायत भवनसाठी ५ कोटी रुपये मंजूर केले असुन आजपर्यंत आपण सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगुन

मतदार संघातील पाणीटंचाई दुर व्हावी म्हणून जवळपास ६०० कोटी रुपयाची वाटरग्रीड योजना मंजूर केली. मतदार संघातील ग्रामस्थांना भविष्यात पाणीटंचाई भासु नये म्हणून वाटर ग्रीड योजना आपण आणली आहे. आजपर्यंत ही योजना फक्त महाराष्ट्रात परतुरला होती. मी पाणीपुरवठा मंत्री असताना आपल्या मतदार संघातील जनतेच्या सेवेकरीता ही वाटरग्रीड योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बारुळ धरणातुन आपण पाणी आणणार असुन ही योजना पूर्ण झाल्यास मतदार संघातील एक ही घर पाणीटंचाईपासुन वंचित राहणार नाही. ज्यामध्ये प्रत्येक कुंटुंबाला ५५ लिटर प्रमाणे पाणी देणार असल्याचा आपला मानस आहे म्हणून भविष्यात कुणालाही पाणीटंचाईच्या झळा पोहोचणार नाही यासाठी आपण काळजी घेत आहोत असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव हलगरे यांनी केले. या कार्यक्रमास मलकापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.