संदिप टिपुगडे यांना आदर्श कोतवाल पुरस्कार

संदिप टिपुगडे यांना आदर्श कोतवाल पुरस्कार
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

विजय बकरे / राधानगरी, प्रतिनिधी



राधानगरीतील संदिप टिपुगडे यांना जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते आदर्श कोतवाल पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूर महसूल विभाग आणि वन विभागाच्यावतीने महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.



संदिप टिपुगडे हे गेली तेरा वर्षे राधानगरी गावासाठी कोतवाल म्हणून काम पाहत आहेत. त्यांची नियोजनबध्द कार्यप्रणाली, वक्तशीरपणा आणि सन-2022-23 सालामध्ये केलेल्या विविध कार्याची दखल घेत महसूल व वन विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदिप टिपुगडे यांच्या पुरस्काराने राधानगरी तालुक्याला पहिल्यांदाच हा मान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.