शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल
संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचे सर्वत्र पडसाद

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काल अमरावतीतील एका सभेत बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संभाजी भिडेंना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.