राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री सदाशिव आंबी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी एम ए ची पदवी संपादित केली
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त तसेच जीवन रक्षक पुरस्कार विजेते गणेशवाडीचे सुपुत्र सुप्रसिद्ध नावाडी श्री सदाशिव अंबी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी एम ए राज्यशास्त्र विषयातून प्रथम श्रेणीमध्ये पदव्युत्तर पदवी संपादक केली सदरची पदवी प्राप्त करून शिक्षणासाठी वयाची गरज नाही हे त्यांनी एम ए ची पदवी घेऊन सिद्ध केले आहे त्याचप्रमाणे त्यांनी समाजातील सर्व घटकांना एक आगळावेगळा आनंदाचा सुखद धक्का दिला आहे.
श्री सदाशिव अंबी हे सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे काम अविरतपणे करत आहेत.
व्यवसायाने नावाडी असल्याने लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून या कार्याला त्यांनी वाहून घेतले आहे याच विचारावर आधारित त्यांनी सन 2005 मध्ये शिरोळ तालुक्यात आलेल्या प्रचंड व भयावह महापुराच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांची जीव वाचवण्यात व लोकांचे संसार उभे करण्यात यश प्राप्त झाले होते या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार बहाल करून त्यांचा गौरव केला होता.
सन 2019 मध्ये आलेल्या महापुराच्या काळात ही अशीच प्रामाणिक लोकांची देशभावी सेवा त्यांनी पार पाडली होती सन 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात ही त्यांनी समाजाची बांधिलकी म्हणून शासनाने आयोजित केलेल्या महापूर निवारण कार्यशाळेत महापुराची कारणे व उपाय याविषयी सखोल व अभ्यासपूर्ण भाषण करून शासनाला जागृत करण्याचे काम त्यांनी उत्तम केले होते.
सन 2002 ते 2007 शिरोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्य निभावले होते या कार्यातूनच त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे.
श्री अंबी यांचा स्वभाव शांत संयमी उत्तम वाणी मानव केंद्रित सेवाभाव साधी राहणी उच्च विचारसरणी या सर्व गुण संपन्न गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते अत्यंत गरिब कुटुंबातून त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नव्हते मात्र शिक्षणावर असलेली दृढ श्रद्धा व विश्वास यामुळेच त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम ए ची पदवी घेऊन 62 टक्के गुण प्राप्त करून पदव्युत्तर पदवीचे यश संपादन केले आहे. अशा सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असलेल्या श्री सदाशिव अंबी यांचे शिरोळ तालुक्यातून कौतुक व अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या सर्व घटकांनी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन सुप्रसिद्ध नावाडी श्री सदाशिव अंबी यांचा आदर्श घ्यावा.
श्री सदाशिव अंबी यांना श्री अशोक मासाळ सर व त्यांच्या मासाळ परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यास खूप खूप शुभेच्छा.