सब - ज्युनियर बॉईज फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघ शिरपूरला रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी) - वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा सब - ज्युनियर बॉईज फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा शिरपूर येथे २५ ते ३० या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ रवाना. के. एस.ए. कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर ६ ते २२ मे या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेण्यात आले. के. एस. ए. फुटबॉल समीतीच्या मार्गदर्शनानुसार प्रदीप साळोखे, निखिल कदम, संतोष पोवार, शरद मेढे व अनिल अडसुळे यांनी १६ दिवसांच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला.
संघातील खेळाडूंची नावे - गोलकिपर बीर संदीप पाटील, सोहम किरण चिले व खेळाडू आराध्य नागेश चौगले, वेदांत अरूण माळी, आर्यन सचिन पोवार, अथर्व राहुल चव्हाण, श्रेयस संतोष कोरावी, रूद्र मकरंद स्वामी, शुभंकर अवधुत भाटे, बेदांत महेश नलवडे, केदार उत्तम भोसले, अभिषेक संजय सासने, समर्थ योगेश पोबार, प्रज्वल दिपक कवडे, ओम गजानन कुराडे, सोहम सतिश माळी-पाटील, पियुष हेमंत गायकवाड, वेदवर्धन जयवंत सुतार या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डी लायसन्स प्रशिक्षक संतोष पोवार व संघव्यवस्थापक शरद मेढे हे कामकाज पाहणार आहेत.
के.एस.ए.चे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, सदस्य मनोज जाधव, दिपक घोडके, प्रदीप साळोखे, व शिबीर प्रशिक्षक निखिल कदम, अनिल अडसुळे यांनी संघाचे प्रशिक्षक व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या. संघाचा पहिला सामना २५ मे रोजी रायगड जिल्हा संघाबरोबर खेळवला जाणार आहे.
संघाला संस्थेचे मा. खासदार व पेटून-इन्-चीफ शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे व के. एस.ए. फुटबॉल समितीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.