कबनूर येथील अवैध्य दारु अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी

कबनूर येथील अवैध्य दारु अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी
वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या कबनूर शाखेच्यावतीने कबनूर येथे सुरु असलेल्या अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

गेल्या अनेक दशकापासून कबनूर येथे गावठी दारू अड्डे सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील बहुसंख्य पुरुष दारूच्या आहारी गेले आहेत. या दारूमुळे आजपर्यंत अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या अवैध्य दारू धंद्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. 


हातकणंगले तालुक्याच्या जिल्हाध्यक्षांच्या पुढाकाराने, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे, कोल्हापूर जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वासंतीताई म्हेत्तर व जिल्हा महासचिव भाग्यश्रीताई ज्ञानवंशी यांच्या उपस्थितीत या मागणीचे निवेदन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आले.

यावेळी यमुना कांबळे, शायरा शेख, सुनीता कांबळे, त्रिवेधी शिरळे, सरिता टोणपे, सखुबाई आवळे, रेखा कुरणे, संतोष कोठावळे, विद्याधर ज्ञानवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.