HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार पुरस्कार शाहू कारखान्यास जाहीर

कै.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार पुरस्कार शाहू कारखान्यास जाहीर

कागल प्रतिनिधी : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राज्यातील सहकारी साखर कारखान्याची शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार जाहीर झाला. गळीत हंगाम हंगाम २०२३-२४ साठी हा पुरस्कार जाहीर झाला. एकाच हंगामात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळविण्याचा मान शाहू कारखान्याने पटकावला आहे. पुणे येथे गुरुवारी तारीख तेवीस जानेवारी रोजी शानदार सोहळ्यात व्हीएसआयच्या पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठवले. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी दिली.

   राष्ट्रीय व राज्य पातळीवर एकूण मिळालेल्या पुरस्कारांमध्ये कारखान्यास मिळालेला हा ७२वा पुरस्कार आहे.यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २७ तर राज पातळीवरील ४५पुरस्कारांचा समावेश आहे. कारखान्याने सभासद शेतकऱ्यांसाठी वीसहून अधिक विविध ऊस विकास योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविले आहेत. त्याचीच दखल घेऊन कारखान्यास हा पुरस्कार मिळाला आहे. 

   या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच शाहू साखर कारखाना परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

...हा तर 'शाहू'च्या सभासद-शेतकरी अभिमुख कामकाजाचा सन्मान-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे (अध्यक्षा, शाहू साखर कारखाना)

 संशोधन केंद्रातील अद्यावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवण्यासाठी कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी पस्तीस वर्षापूर्वी कारखान्यात स्वतंत्र ऊस विकास विभाग सुरू केला. ऊस विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याचा फायदा शाहूच्या सभासद शेतकऱ्यांना होत आहे. कारखाना चालवणेसाठी त्यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे, सभासद शेतकरी यांनी विश्वासाने व प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी- कर्मचारी यांच्या कष्टाची जोड याचाच हा परिपाक आहे. त्यांच्या पश्चात पुरस्कारांमध्ये राखलेले सातत्य म्हणजे समरजितसिंहराजे घाटगे व संचालक मंडळाच्या कुशल नियोजनाखाली सुरु असलेल्या 'शाहू'च्या सभासद-शेतकरी अभिमुख कामकाजाचा हा सन्मानच आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.