राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी देवराज पाटील यांची निवड
इस्लामपूर (प्रतिनिधी) : शेणे सहकारी सेवा सोसायटी च्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष.देवराज पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल सोसायटीचे चेअरमन संजय पाटील व्हा.चेअरमन वसंत पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी देवराज पाटील म्हणाले की सेवा सहकारी सोसायटीने सभासदांचे हित जोपासावे . व संचालकांनी आदर्शवत काम करून सोसायटी.सक्षम पणे चालवावी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . .सोसायटीच्या वतीने सभासदांना सहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला .
या कार्यक्रमास उपसरपंच संतोष निकम, डाॅ. महेश पाटील. माजी चेअरमन बाळासो पाटील ,रंगराव पाटील , नेताजी पाटील, मारूती पाटील ,सुभाष आडके.विकास पाटील.विजय मदने प्रमोद पाटील,राजाराम चव्हाण, संभाजी पाटील,अप्पासो पवार, दीपक पाटील, अर्जुन धुमाळ,रवी पाटील ,योगेश सावंत सोसायटीचे सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहवाल वाचन सचिव अशोक नायकल यांनी केले. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक शंकर पवार यांनी केले. आभार संचालक बजरंग पाटील यांनी मांनले.