अशोक रावण पिता पालक तर मीना पोळकर माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी* *विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी,पालक, शिक्षक हा त्रिकोण महत्वाचा- प्राचार्य बी के मडिवाळ* *शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज कागलमध्ये माता पालक पिता पालक

अशोक रावण पिता पालक तर मीना पोळकर माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी* *विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी,पालक, शिक्षक हा त्रिकोण महत्वाचा- प्राचार्य बी के मडिवाळ* *शाहू हायस्कूल, ज्यूनिअर कॉलेज कागलमध्ये माता पालक पिता पालक

पत्रकार-सुभाष भोसले

शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील श्री शाहू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज कागल मध्ये माता पालक व पिता पालक संघाची स्थापना करण्यात आली. माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी मीना पोळकर तर पिता पालक संघाचे उपाध्यक्षपदी अशोक रावण यांची निवड करण्यात आली. 

प्रारंभी रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य हे या दोन्हीही संघाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रशालेचे प्राचार्य माननीय श्री बी के मडिवाळ यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल उपमुख्याध्यापक टी ए पोवार व पर्यवेक्षक एम व्ही बारवडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर पिता पालक संघाचे उपाध्यक्ष अशोक रावण यांचा सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री एम व्ही बारवडे यांच्या हस्ते तर माता पालक संघाच्या उपाध्यक्ष मीना पोळकर यांचा सत्कार ज्येष्ठ विज्ञान अध्यापिका सौ आर आर कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक हा त्रिकोण महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रशालेकडून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये पालकांसाठी सिंहाचा वाटा असणे आवश्यक आहे. मंदिरांबरोबरच विद्यामंदिरेही दानशूर व्यक्तींच्या दातृत्वातून भौतिक सुविधांच्या बाबतीत सक्षम बनली पाहिजेत. त्यासाठी पालकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माता व पिता पालक संघाचे पदसिद्ध अध्यक्ष व प्रशालेचे प्राचार्य श्री बी के मडिवाळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.

यावेळी उपप्राचार्या सौ. एस एस पाटील, एस आर पोतदार, योगेश कदम, अर्जन चौगुले, लता कोरवी, वर्षा पाटील यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन बाबासो हळिज्वाळे यांनी तर आभार महेश शेडबाळे यांनी मानले