स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या जीवनातील सर्वकाळ देशासाठी समर्पित केला : आ. विनय कोरे

स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या जीवनातील सर्वकाळ देशासाठी समर्पित केला : आ. विनय कोरे
स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या जीवनातील सर्वकाळ देशासाठी समर्पित केला : आ. विनय कोरे

मलकापूर / प्रतिनिधी


भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या भूमीतील स्वातंत्र्यवीरांनी आपल्या जीवनातील सर्वकाळ देशासाठी समर्पित केला. त्यांचा या त्याग आणि बलिदानातूनच देश स्वतंत्र्य झाला. या बलिदानाचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी केले. मलकापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मलकापूर येथे नगरपरिषद आवारातउभारण्यात आलेल्या शीला फलकाचे अनावरण 'वृक्षारोपण व शहीद स्वातंत्र्य सैनिक यांचे नातेवाईक 'त्याबरोबरच माजी सैनिक तसेच सध्या सेवा करत असणाऱ्या जवानांच्या आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.



पुढे बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा इतिहास फार मोठा आहे . आपलं सर्वस्व देशाला अर्पण करून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या थोर व्यक्ती या आपल्यासाठी अभिमानास्पद आहेत. ज्यांच्यामुळे देश सुरक्षित रहावा व ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांचे कार्य देशासाठी चिरंतन प्रत्येकाच्या मनामध्ये उभा राहावे. याच माध्यमातून शिलालेखाच्या रूपाने त्यांचा त्याग आपल्यासमोर उभा राहत आहे. राष्ट्र भक्तीच्या प्रती आपली कर्तव्य भावना फार महत्त्वाची आहे.


यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण गट विकास अधिकारी सुस्मिता शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रें, मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.