महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या - एन.एस. सावंत

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. सन 2025-26 या अर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदु-खाटीक, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गामधील लाभार्थीनी http://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस.सावंत यांनी केले आहे.
अनुदान योजनेचे उद्दिष्ट - भौतिक - 80, अर्थिक – 40 लाख, ही योजना 50 हजार रुपये पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये हे अनुदान तर 25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज लाभार्थ्यांला दिले जाते.
बीजभांडवल योजनेचे उद्दिष्ट - भौतिक - 80, अर्थिक -अनुदान 40 लाख रुपये व बीजभांडवल 170 लाख रुपये. ही योजना 50 हजार 1 ते 5 लाखापर्यंत असून बँकेची 75 टक्के रक्कम , लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के यामध्ये 50 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे.