राधानगरी मतदार संघात वाढलेली बेरोजगारी हे आबिटकरांचेच पाप : के पी पाटील यांचा प्रहार
के पी ना आजऱ्यातून मोठे मताधिक्क्य देणारच : अभिषेक शिंपी
राधानगरी प्रतिनिधी : राधानगरी विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षांत तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प आमदार प्रकाश आबिटकर यांनी उभारला नसल्यामुळे या मतदारसंघात बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली हे त्यांचेच पाप असल्याचा जोरदार प्रहार माजी आमदार के पी पाटील यांनी केला.
आजरा येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
के पी पाटील पुढे म्हणाले,"राधानगरी भुदरगड आणि आजरा अशा तीन तालुक्यांतून कामधंद्यासाठी पुणे मुंबई, कोल्हापूर सारख्या शहरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघातच एमआयडीसी कार्यान्वित करण्याबरोबरच अजून काही रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या असत्या तर ही तरुणाई आपल्या घराजवळच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने थांबली असती. परंतु सत्तेत असूनही आमदार आबिटकरांनी आपले राजकीय कौशल्य तरुणांच्या भल्यासाठी कामाला लावले नाही. उलट भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे मंजूर असलेली एमआयडीसी यांच्या नाकर्तेपणामुळे सुरू झाली नाही. त्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार मिळाला असता परंतु तोही ठप्प करण्यात यांनी धन्यता मानली. "
अभिषेक शिंपी म्हणाले," के पी पाटील हे अनुभवी व सहकारातील जाणते नेते असून या जिल्हापरिषद मतदारसंघातून त्यांना आम्ही हजारोंचे मताधिक्य देणार."
शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे,अखलातभाई मुजावर, आरिफ खेगडेकर,राहुल देसाई, अजय देशमुख,तानाजीराव देसाई,संग्राम सावंत,युवराज पवार आदींची भाषणे झाली.
सभेसाठी मुकुंद देसाई,जी एम पाटील,सुधीर देसाई, संभाजीराव पाटील,संजय सावंत,उदय पवार,दत्ता पाटील, रणजीत देसाई,रवींद्र भाटळे, अबुसईद माणगावकर,रशीद पठाण,रचना होलम,संजीवनी सावंत,मनीषा देसाई,कामिनी पाटील,शकुंतला सलामवाडे आदी उपस्थित होते.
*रोजगाराच्या संधी निर्माण करणार*
के पी पाटील म्हणाले,"आबिटकर रोजगारनिर्मिती करू शकले नसले तरी मी मात्र या मतदारसंघात एमआयडीसी उभारणारच. शिवाय रोजगार निर्मितीच्या संधी देणारे छोटे-मोठे विविध प्रकल्प सुरू करण्यावर माझा भर राहील. कोल्हापुरात आयटी पार्क सुरू करण्यासाठीही मी विधानसभेत प्रयत्नशील राहील.
*सुषमा अंधारेंचा आबिटकरांवर हल्लाबोल*
सभेदरम्यान पाऊस असल्याने व त्यातच उशिरा पोचल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सभेला लाईव्ह प्रणाली द्वारे संबोधित केले. सुरत, गुवाहाटीला गेलेल्या ४० गद्दारांमध्ये इथले प्रकाश आबिटकर हे एक गद्दार निघालेत ही या मतदारसंघाची शोकांतिका असून 'जिकडे मेवा तिकडे थवा' अशी या आबिटकरांची वृत्ती आहे, अशा शब्दांत त्यांनी आमदार आबिटकरांवर हल्ला चढविला.