संस्थापक - श्रीमंत छत्रपती श्री. उदयनराजे भोसले महाराज साहेब सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी महिला पदाधिकारी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त जाहीर सत्कार

संस्थापक - श्रीमंत छत्रपती श्री. उदयनराजे भोसले महाराज साहेब सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी महिला पदाधिकारी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त जाहीर सत्कार

सावंतवाडी प्रतिनिधी :- अमित वेंगुर्लेकर

   मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच तालुक्यातील गरजू लोकांना वेळोवेळी मदतीचा हात देणाऱ्या संस्थापक - श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी महिला पदाधिकारी यांचा मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन भारत यांच्या माध्यमातून शाल, श्रीफळ,प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले.

 संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय श्री. संतोषजी तळवणेकर यांचे सामाजिक कार्य नेहमीच कार्यकर्त्यांना एक बोध घेण्यासारखे आहे,यामुळेच आज सदर संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी भक्कम बनली आहे.त्याच बरोबर महिला पदाधिकारी सौ.संचीता गावडे व त्यांची महिला पदाधिकारी कार्यकारिणी यांच्या माध्यमातून सादर संघटनेत एक मोठी ताकद निर्माण झाली आहे. या अशा कर्तृत्ववान महिला भगिनीचा जाहीर सत्कार मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी यांच्या माध्यमातून महिला पदाधिकारी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन  महिला जिल्हाध्यक्ष सौ.नीलम गवस,सानिया शेख, जरीना शेख व इतर महिला पदाधिकारी यांच्या हस्ते  कर्तृत्ववान महिला भगिनी सौ.सरिता भिसे, सौ.अक्षता कुडतरकर,सौ. नीलिमा लठ्ठे,सौ. संचिता गावडे,सौ. संगीता पारधी यांना शाल,श्रीफळ, प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देवून गौरविण्यात आले. 

सादर कार्यक्रमास प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री रिजवान बाडीवाले,संजय गावडे, संतोष तळवणेकर, आबिद कीत्तुर, डी ई एस पारधी, रामिज मुल्ला,शाहबाझ शेख,परेश सोंसुरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.