पानिपतकार विश्वास पाटील यांची ग्रंथ संमेलनात नवी दिल्ली येथे भाषणासाठी निवड
पानिपतकार विश्वास पाटील यांची ग्रंथ संमेलनात नवी दिल्ली येथे भाषणासाठी निवड
पञकार-नारायण लोहार
सिंधुदुर्ग-दि.27फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रंथ संमेलनात भाषण करण्यासाठी पानिपतकार विश्वास पाटील हे दक्षिण भारताचे नेतृत्व करणार आहेत. मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मा.विश्वास पाटील यांना दिल्ली येथे ग्रंथ संमेलनात भाषण करण्याची संधी मिळाली आहे.दक्षिण भारतातून एकाच व्यक्तीची निवड करणात आली आहे.खरोखरच एका जेष्ठ साहित्यिकाचा,त्याचबरोबर त्यांच्या लेखन साहित्याचा सन्मान आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विश्वास पाटील यांचे साहित्य साता समुद्रापलीकडे गेले आहे.भारतीय प्रशासन सेवेत काम करून लेखन करणे ही अशक्यप्राय बाब आहे.परंतु विश्वास पाटील यांनी ती लिलया पार पाडली आहे.त्यांनी पानिपत ,झाडाझडती,महानायक,
संभाजी,महासम्राट तसेच ग्रामिण जीवनावर आधारित कलालचौक असे अनेक प्रकारचे लेखन केले आहे.विश्वास पाटील यांची ग्रंथ संमेलनात नवी दिल्ली येथे भाषणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेक साहित्यिकांनी तसेच त्यांच्या वाचकांनी अभिनंदन केले आहे.