आदमापुरात संपन्न होणार सामुदायिक विवाह सोहळा ..!

कोल्हापूर - 'गोकुळ' चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० रोजी आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा मंदिर येथे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक रीतिरिवाजानुसार विवाह सोहळ्यांसाठी होणारा खर्च न परवडण्यासारखा असतो या पद्धतीला कुठेतरी फाटा बसावा आणि संबंधित कुटुंबाला आर्थिक फटका बसू नये या उद्देशाने या ट्रस्टच्या वतीने तितक्याच दिमाखदार विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.
यावेळी ट्रस्टकडून वधू - वरांना पेहराव, मणिमंगळसूत्र, भांड्याचा सेट, लग्नविधीसाठी लागणारे सर्व साहित्य, वन्हाडी मंडळी यांना भोजन व्यवस्था तसेच शासनाकडून वधू पित्यास अनुदान मिळवून दिले जाते. जास्तीत जास्त वधू-वरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भोगावती शिक्षण प्रसारक संचालक व अरुण डोंगळे, ट्रस्ट उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी केले आहे.