संजीवनी तोडकर अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित ..!

कोल्हापूर - तोडकर संजीवनी निसर्गोपचाराच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार करून निसर्गाचे महत्त्व व आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल संजीवनी तोडकर यांना तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीवनी तोडकर यांनी नागरिकांनी नैसर्गिक व आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. जडीबुटीयुक्त चूर्ण लोकांपर्यंत पोहचवून त्यांना निरोगी आरोग्याचे आवाहन केले. दातांच्या व हिरड्यांच्या मजबुतीसाठी बकुळ, माजुफळ, तुवरु, मिसवाकसारख्या वनस्पतींचा वापर करून आयुर्वेदात प्रथमच दंतमंजनाची निर्मिती केली. अशा त्यांच्या सर्व कार्याची दखल शासन दरबारी घेतली गेली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे, भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, पुरस्काराचे राष्ट्रीय समिती अध्यक्ष सागर धापटे - पाटील उपस्थित होते.