आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी मोतीबाग तालमीच्या कुस्तीगीरांची निवड

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी मोतीबाग तालमीच्या कुस्तीगीरांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - व्हिएतनाम येथे 16 ते 26 जून 2025 दरम्यान होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या भारतीय खेल प्राधिकरण दत्तक मोतीबाग तालमीचे पट्टणकडोलीचे कुस्तीगीर युवराज सिद्धू कामण्णा याने 51 किलो वजन गटामध्ये व यश काशिण्णा कामण्णा याने 45 किलो वजन गटामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चंदीगड येथील पलवळ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये दोघांनी प्रथम क्रमांक मिळवून आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

या निवडी बद्दल कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी खेल प्राधिकरणाचे कोच अजयसिंह लोधी व पै. दादू चौगुले उपस्थित होते.

दोघांना उस्ताद सोमनाथ कामण्णा, साईचे कोच अजयसिंह लोधी, निवृत्त कोच सी.बी. चव्हाण व कोल्हापूर तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी.पाटील व जनरल सेक्रेटरी महादेवराव आडगुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.