देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मरीन ड्राइव्ह पोलिसांकडून तरुणाविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश जगताप असं या तरुणाचं नाव आहे.

सुरेश हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रहिवासी आहे. त्याने कर्जबाजारीपणामुळं हे टोकाच पाऊल उचललं. मंत्रालयात जाण्याचा पास घेऊन गेलेल्या सुरेशने सहाव्या मजल्यावरील फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेरील लॉबीत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेची माहिती मिळताच स्थानिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सुरेश जगताप याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.