जागतिक रक्तदान दिनानिमित्त*फडके सरांचे १२३वे रक्तदान
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
मिरज :येथील मिरज शहर पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या वसंतदादा रक्त केंद्र येथे जागतिक रक्तदान दिन १४ जून व रवींद्र फडके यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त रवींद्र फडके यांनी स्वतः आपले १२३वे रक्तदान केले. यावेळी वसंतदादा रक्तपेढीचे संस्थापक डॉ मुकुंद पाठक, डॉ. बी. टि. कुरणे ,डॉ. जयदीप पोळ ,डॉ. वैशाली पोळ क्लासेस संघटनेचे सूर्यकांत तवटे, महावीर कोले ,राम हुन्नूरगे तसेच १११ वेळा रक्तदान केलेले सुधीर स्वामी दैनिक बंधुताचे कार्यकारी संपादक धनंजय पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
१९८५ ते१९९५ हा काळ रक्तदानासाठी अवघड असा काळ होता. या काळात रक्तदान चळवळीचे अग्रदूत म्हणून फडके सरांनी रक्तदानासाठी विविध उपक्रम आयोजित केले. रक्तदानासाठी प्रेरणा देण्यासाठी सिने अभिनेते सूर्यकांत मांडरे ,चंद्रकांत मांडरे, निळू फुले, अशोक सराफ, अनंत जोग , गीतकार जगदीश खेबुडकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे , नरेंद्र दाभोळकर जिल्हाधिकारी नितीन करिअर जिल्हा पोलीस प्रमुख वाघ पासून कृष्ण प्रकाश आदी मान्यवरांना फडके क्लासेस मध्ये बोलावले. अशोक सराफ यांच्या हस्ते अडीचशे रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरण केले होते. अशा अनेक आठवणी डॉक्टर मुकुंद पाठक व डॉक्टर बी टी कुरणे यांनी सांगितल्या.
फडके क्लासेसच्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आवर्जून रक्तदान केले .त्यामध्ये मोरेश्वर करमरकर, निलेश माळी, गौरव कांबळे, हेमंत बिरजे ,सय्यद शहानवाज ,अनिल भाऊसाहेब शिंदे, नवनीत कोल्हापुरे, ॲड प्रकाश रोजे, ज्योती हुल्लगबाळी, सुरज जमणे , रेवगोंडा उर्फ राहुल पाटील व रोहित कुंभारकर यांचा समावेश होता. रक्तदान शिबिराचे संयोजन युवराज मगदूम यांनी केले.